देवदत्त साबळेंच्या सदाबहार संगीताची जादू ‘आक्रंदन’मध्ये

Gavie Chahal in "Mohe Rang De"

‘हि चाल तुरुतुरु’ असो, ‘मनाच्या धुंदीत लहरीत’ अशा असंख्य प्रेमगीतांनी एका संपूर्ण पिढीवर भुरळ घालणारे ज्येष्ठ संगीतकार देवदत्त साबळे यांच्या संगीताची लोकप्रियता ४० वर्षांनंतर देखील कायम आहे. त्यांच्या सदाबहार संगीताची जादू बऱ्याच कालावधीनंतर ‘पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स’च्या ‘आक्रंदन’ या आगामी मराठी चित्रपटात अनुभवता येणार आहे. गोविंद आहेर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांनी केलंय. ८० हून अधिक मालिकांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर ‘आक्रंदन’ चित्रपटाच्या माध्यमातून शशिकांत देशपांडे चित्रपट दिग्दर्शनात प्रवेश करीत आहेत.

देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेली गीते ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिली असून हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. सुधीर मोघेंच्या शब्द्दांची किमया ‘आक्रंदन’ या आशयघन सिनेमात पहाता येईल. सुधीर मोघेंच्या शब्दातील आर्तता संगीताच्या साथीतून देवदत्त साबळे यांनी अचूक व्यक्त केली असून यातील ‘ देव जेवला आम्ही पाहिला’ या आदिवासी उत्सवी गीताला स्वतः गायले देखील आहे. देवा बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या गीतात युनिक वाद्यांचा वापर करण्यात आला असून पारंपारिक पद्धतीचे संगीत ऐकायला मिळणार आहे. यातील ‘दाद मी मागू कुठं ? गा-हाणं नेऊ कुठं ‘?’ हे गाणं सुरेश वाडकरांनी अप्रतिम स्वरात गायलं आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलंय.

उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात विक्रम गोखले, स्मिता तळवळकर, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, तेजश्री प्रधान, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या भूमिका आहेत. सुधीर मोघेंची आशयघन गीते आणि देवदत्त साबळे यांचे सुरेल संगीत असा दुहेरी योग असलेला ‘आक्रंदन’ चे संगीत प्रेक्षकांना नक्कीच एक पर्वणी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *